‘कोरोना’च्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली; हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाने प्राण सोडले

मुंबई | मुंबईत असंवेदनशीलतेचा कळस दाखवणारा प्रकार समोर आला आहे. हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाला कोरोना झाल्याच्या संशयातून शेजाऱ्यांनी त्याला मदत नाकारली. त्यामुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे.

चेंबूरमध्ये राहणाऱ्या समीर रविंद्र नासकर यांना 10 एप्रिल रोजी संध्याकाळी हृदयविकाराचा धक्का आला. घरात त्यांची पत्नी आणि मुलगी दोघीच होत्या. 61 वर्षीय पित्याला रुग्णालयात नेण्यासाठी मायलेकींनी धावाधाव सुरु केली. शेजाऱ्यांची बेल दाबून त्यांनी मदतीची याचना केली.

नासकर यांना ‘कोरोना’ झाल्याच्या संशयातून शेजाऱ्यांनी रुग्णालयात नेण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्णवाहिका येण्यास उशीर झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने समीर नासकर यांनी रुग्णालयात प्राण सोडले.

समीर नासकर यांचा मृतदेह पुन्हा घरी आणण्यात आला. मात्र कोरोनाच्या भीतीपोटी त्यांनी अंत्यसंस्काराला मदत करण्यास नकार दिला.

महत्वाच्या बातम्या –

-अभिनेत्री पूनम पांडेचा न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

-नरेंद्र मोदी उद्या करणार महत्त्वाची घोषणा; सकाळी 10 वाजता देशवासीयांशी साधणार संवाद

-‘हातात पैसे नसताना गरीब कसे जगू शकतात?’; चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल

-आता महिंद्रा कंपनीनं कोरोनाच्या लढाईमध्ये दिल ‘या’ महत्वाच्या गोष्टीचं योगदान

-राज्यात कोरोनाचा क्रम चढताच रुग्णांचा आकडा 2 हचाराच्या वरती; एका दिवसात 82 रुग्णांची वाढ