“देश एका अभ्यासू आणि संयमी नेत्याला आणि उत्कृष्ट संसदपटूला कायमचा मुकला आहे”

मुंबई : देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचं वयाच्या 66 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं आहे. जेटली यांच्या निधनानंतर देशातील राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

अरुण जेटली यांच्या निधनाने अभ्यासू व संयमी नेता हरपला, अशी भावूक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

निष्णात वकील असलेले जेटली यांनी सभागृहात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्यानं देश एका अभ्यासू व संयमी नेता आणि उत्कृष्ट संसदपटूला कायमचा मुकला आहे, असं म्हणत छगन भुजबळ यांनी अरुण जेटली यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

दरम्यान, श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी अरुण जेटलींना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महत्वाच्या बातम्या-