Top news पुणे महाराष्ट्र

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

eknath shinde 1 e1655805762374

मुंबई | नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही. या समस्येची दखल राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतली असून याबाबतचा शासन निर्णय (Government Rule) त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत.

खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून लाखो शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं.

महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत, असं ते म्हणाले होते.

या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी हे उद्या रोजी शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबतच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; 3 बड्या नेत्यांचा पक्षाला रामराम 

“मंत्री-संत्री व्हा पण सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे, करेक्ट कार्यक्रम करणार” 

‘उद्धव ठाकरेंना दुखावणं म्हणजे बाळासाहेबांना दुखावण्यासारखं’ -सुप्रिया सुळे 

‘या’ कारणामुळे सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी