“महिला सुरक्षेवर न थकता भाषणं देणारे नेते कुठं आहेत?, सरकारला केव्हा जाग येणार आहे”

मुंबई | अमरावतीमध्ये 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे. कारण महामारीच्या काळात असे प्रकार घडणं हे खूप क्लेशदायक आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपला संताप व्यक्त करत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

महिला सुरक्षेवर न थकता भाषणं देणारे नेते कुठं आहेत आता?, आम्ही पुन्हा पुन्हा विचारत आहोत की दिशा कायदा कधी येणार आहे?, अशा प्रकारच्या किती वाईट आणि घाणेरड्या घटना घडल्यावर सरकारला जाग येणार आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला केला आहे.

संबंधित मुलीने हिम्मत केली आणि हा प्रकार उघडकीस आला. पण माहित नाही ग्रामीण भागात कोरोनाच्या नावाने कोणते प्रकार घडतात आणि ते महिलांना सहन करावे लागतात. निश्चितपणे आता महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे महिलांच्या जगण्यातील सन्मान हरवत चालला असल्याचं वाटत असून आजची महिलांची सुरक्षा ही पुर्णपणे देवाच्या भरोशावर राहिली असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एका सरकारी ल‌ॅबमध्ये अशा प्रकारची घटना कशी काय होऊ शकते. महत्वाचं म्हणजे त्या आरोपीची हिम्मतच कशी झाली त्या मुलीला नेण्याची असे अनेक प्रश्न उपस्थित होतात मात्र आता सरकारला जनजागृतीची करण्याची गरज आहे की स्वॅब टेस्टींग ही फक्त नाकाच्या द्वारे घेतली जाते, असंही चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

सलाम सोनू! 3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी, वाढदिवसानिमित्त सोनूनेच दिलं सर्वांना गिफ्ट!

फूटपाथवर राहून दहावीत उत्तीर्ण झालेल्या अस्माला घर मिळवून देणयासाठी प्रयत्न करणार- आमदार प्रताप सरनाईक

अयोध्येत बुध्दविहार साकारण्यासाठी सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र येऊन लढा देणं गरजेचं- आनंद शिंदे

तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब नमुने प्रकरणावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा संतापल्या; म्हणाल्या…

पत्नीला रोगानं ग्रासलं, नातेवाईकांनी त्याला नाकारलं; तो मात्र एकटाच जळत राहिला!