शाळा बंद पण दहावी-बारावी बोर्डाचे पेपर मात्र ठरलेल्या वेळेतच मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

मुंबई |  दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत निवेदन दिलं. यावेळी ठरलेल्या तारखांना विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील. ठरलेल्या वेळेतच दहावी आणि बारावीच्या परीक्षा होतील, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरांमधील जिम्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव तात्पुरत्या स्वरुपात आज मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे, अशी माहिती  उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली आहे.

पुढील 15 दिवस जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. आता कुठे करोना व्हायरसची लक्षणं गांभीर्याने दिसू लागली आहेत.गंभीरता अधिक होण्याची वाट न पाहता तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे परीक्षा लवकर घेण्यापेक्षा उशिरा करण्यासंबंधी विचार सुरु आहे. शाळा आणि आरोग्य विभागाशी याबाबत चर्चा करुन नंतर आढावा घेऊन काय निर्णय घेऊ शकतो याचा विचार करु, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, जनतेमध्ये भीती आहे म्हणून 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांव्यतिरिक्त पिंपरी चिंचवड आणि पुणे येथील शाळा आपण पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या – 

-कोरोना व्हायरसने उडवली क्रिकेटची दांडी; भारत-आफ्रिका वनडे मालिका केली रद्द

पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा चढता क्रम; पुणेकरांमध्ये भितीच वातावरण

तुमच्या डोक्यात लोकप्रियतेची हवा घुसलेय, निलेश साबळे माफी मागा; संभाजीराजें आक्रमक

कोरोनाचा झटका पुणे मुंबई ठाण्यासह नागपुरात शाळा, मॉल्स,जिम्स, थिएटर्स बंद!

-“एकही आमदार सोबत नाही म्हणून राजीनामा दिला त्याच भाजपला आज टोला मारतायत”