परराज्यातील मजुरांना मुख्यमंत्र्यांचं अभय; दिली ही महत्त्वाची माहिती

मुंबई | राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांनी अन्यत्र कुठेही जाऊ नये, महाराष्ट्र सरकार सर्वांची खबरदारी घेत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

इतर राज्यातील पाच लाख मजुरांच्या दोन वेळा जेवणाची सोय, राहण्याची सोय केलेली आहे. कोणालाही कुठे जाण्याची आवश्यकता नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मी संयमाची भाषा वापरत आहे, विनंती करतोय, हात जोडतोय, जात-धर्म कोणताही असो कोरोना वायरस एकच आहे. मात्र समाजात दुही निर्माण करण्याचा वायरस पसरवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर कोविडपासून मी वाचवेन पण अशा वृत्तींना वाचवणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या एकीला कोणी नख लावण्याचा प्रयत्न करणार असेल तर सहन करणार नाही, जाणीवपूर्वक चुकीचे व्हिडीओ पसरवू नका, त्यांच्यावर कारवाई करु, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-भाजपवाल्यांनो, मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरणार; जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

-लॉकअपमधून बाहेर, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अरुण गवळीचा ‘कॅरम’गेम; पाहा व्हीडिओ

-“महाराष्ट्रातील लॉकडाउनचा कालावधी ‘इतक्या’ दिवसांनी वाढवला जाऊ शकतो”

-एका विषाणूसमोर गुडखे टेकणाऱ्यांपैकी आपण नाही, आत्मविश्वासाने लढू आणि जिंकू- उद्धव ठाकरे

-मी माझ्या महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवेन पण तुम्हाला सोडणार नाही- उद्धव ठाकरे