काॅफी आणि बरंच काही! वाचा काॅफी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

नवी दिल्ली | लोकांना उठल्या उठल्या चहाचा पिण्याची सवय असते तर काहींना काॅफीची. याच्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुुरुवात होत नाही. त्यामुळे आपल्याला चहाप्रेमी आणि काॅफीप्रेमी हमखास मिळून जातील.

काॅफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. आरोग्यासाठी आणि त्वचेसाठीही काॅफीचा उपयोग होतो. त्यामुळे अनेकजण काॅफीला प्राधान्य देतात.

रोज 3 ते 4 कप कॉफी प्यायल्यामुळे मधुमेहाचा धोका सुमारे 50 टक्के कमी होतो. काॅफी शरीराला उत्तेजित करण्याचे काम करते. त्यामुळे अनेक वेळा रात्रभर अभ्यास करताना काॅफी पिण्यास प्राधान्य दिले  जाते.

काॅफीमुळे त्वचाही चांगली होते. अनेकवेळा काॅफीचा स्क्रब म्हणून वापर केला जातो. याशिवाय फेसपॅकमध्येही काॅफीचा वापर केला जातो.

कॉफीच्या उपयोगाने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा चमकदार होते. काॅफीवर अनेक संशोधन झाली आहेत.

कॉफीतले आरोग्यदायी गुणधर्म, कशा पध्दतीनं कॉफी प्यायली तर शरीराला फायदे होतात, अती कॉफी पिल्याचे तोटे या अनेक विषयांवर संशोधनं झाली आहेत.

कॉफी इतर अनेक रोगांपासून संरक्षण देते, ज्यामध्ये हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा, यकृताचा सर्वात सामान्य कर्करोग असल्याचे समर्थन करतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

  चिंताजनक! कोरोना महासाथीच्या रोगानंतर राज्यात आणखी नवं संकट

  “…तर बाॅलिवूड चित्रपटांचं महत्त्व कमी होण्याची शक्यता”; अभिनेत्यानं व्यक्त केली भीती

 अभिनेत्री समंथानं डिलीट केली घटस्फोटाची पोस्ट, पुन्हा चर्चांना उधाण

“राज्यातील सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्र सरकार बरखास्त करा”

“बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती”