“रविवारी शाळेला सुट्टी असते तरीही मोदींच्या प्रसिद्धीसाठी पोरांना त्रास”

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे (Metro) त्यांच्या हस्ते ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन झालं. या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चक्क दिव्यांगमुलांसोबत प्रवास केला. त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचा प्रवास गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा केला. यावेळी त्यांच्यासोबत दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांची पंतप्रधानांनी आस्थेने विचारपूस केली. नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांसोबत गप्पा देखील मारल्या आहेत.

मेट्रोत विद्यार्थ्यांसोबत बोलतानाचा नरेंद्र मोदींचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोवरून महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास देत आहात?, असा सवाल काँग्रेसने मोदींना केला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी गो बॅकचे नारे पुण्यात बघायला मिळत आहे. देशभरात मोदींचा विरोध होतोय. पुण्याच्या जनतेची मोदी गैरसोय करता आहेत. पुणेकर देखील भाजपवर नाराज दिसत असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्याला आणि महाराष्ट्राला भरपूर दिलंय” 

भर सभेत अजित पवारांचे राज्यपालांना खडे बोल, मोदीही पाहत राहिले

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकमेकांना आग्रह, फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

मोबाईलवरुन मेट्रोचं तिकीट काढत मोदींचा मेट्रोतून प्रवास, दिव्यांग विद्यार्थ्यांसोबतही साधला संवाद 

पुणे महानगरपालिकेत नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण!