काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जवळपास निश्चित; यांच्या नावांचा समावेश

मुंबई |  विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्ष जोरात तयारीला लागले आहेत. उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरूवात झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या देखील पहिल्या यादीतील नावं जवळपास निश्चित झाली आहेत.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची शुक्रवारी बैठक झाल्यानंतर आता काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीतली नावं बाहेर आली आहेत. यात काही मोजके अपवाद वगळता जवळपास सर्वच उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

बाळासाहेब थोरात (संगमनेर ), अशोक चव्हाण (भोकर), विजय वडेट्टीवार (ब्रम्हपूरी), डी. पी. सावंत (नांदेड), वसंत चव्हाण (नायगाव, नांदेड), अमीन पटेल (मुंबादेवी), वर्षा गायकवाड (धारावी), भाई जगताप (कुलाबा), नसीम खान (चांदीवली), यशोमती ठाकूर (तिवसा), के. सी. पडवी (अक्कलकुवा), संग्राम थोपटे ( भोर ), संजय जगताप (सासवड), वीरेंद्र जगताप (धामनगाव), सुनील केदार (सावनेर), अमित देशमुख (लातूर), बसवराज पाटील (औसा), विश्वजित कदम (भिलवडी), प्रणिती शिंदे (मध्य-सोलापूर) यांची नावे जवळपास निश्चित आहेत.

दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव मात्र विधानसभेच्या यादीत नाहीये. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांना रिंगणात उतरवलं जाऊ शकतं, असा अंदाज आहे.

दरम्यान, पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी काँग्रस ही यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-