पंतप्रधान मोदींनी चीनच्या कटकारस्थानाला बळ देऊ नये- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई | नरेंद्र मोदी यांनी लडाखमध्ये भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असं वक्तव्य सर्वपक्षीय बैठकीत केल होतं. यानंतर त्यांच्यावर टीका होत असून पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांनी लडाखच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला घेरलंय.  पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना मोदी यांनी चीनच्या कटकारस्थानाला बळ देऊ नये असं म्हटलं आहे.

चीनची घुसखोरी आम्हाला कदापिही मान्य नाही. घुसखोरी रोखणं केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या निर्णयात कॉंग्रेसचा सरकारला पाठिंबा असेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा चीन गैरफायदा घेत असून वाटाघाटी करताना याचा प्रभाव पडणार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

-“…तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख या रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या का?”

-धक्कादायक! ‘या’ 16 वर्षीय TikTok स्टारने केली आत्महत्या