कंटेनरची रिक्षाला जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

अहमदनगर | एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. अहमदनगरच्या पोहेगाव कोपरगाव रस्त्यावर हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

कंटेनर आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. या अपघातात एकूण दहा जण गंभीर जखमी झालेत. त्यातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ उपचारासाठी नेण्यात आलं. कंटेनरची रिक्षाला धडक बसल्यानं ही दुर्देवी घटना घडली आहे.

जखमी झालेल्या व्यक्तींना जनार्दन स्वामी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या मृत झालेल्या व्यक्तींमध्ये दोन जण महाविद्यालयीन विद्यार्थीनी होत्या.

पोलीस घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Stock Market: शेअर मार्केटमध्ये घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका

  ‘अब चंपाकली मुरझायी हैं’; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

  उष्णतेच्या लाटेविषयी हवामान विभागाचा गंभीर इशारा, म्हणाले…

  राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती

  “मी भाजपसोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही”