कोरोनाचा असाही परिणाम; 2020 वर्षात झाले सर्वाधिक ब्रेकअप

कोरोना संकटाने जगभर थैमान घातले आहे. पण कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जगभर झालेल्या संशोधनामुळे हळू हळू या आजारातून वाचवण्याचे उपाय सापडत आहेत. कोरोनाच्या महामारीनं सगळ्यानांच हैरान करुन सोडलं आहे. कोरोनाच्या साथीनं वर्षभरात अनेक बदल घडून आले. या कालावधीत सगळ्यांना बऱ्याच खडतर गोष्टींचा सामना कारावा लागला. लाॅकडाऊनमध्ये अनेकांच्या नात्यात दुरावा आल्यानं ब्रेकअपचं प्रमाण वाढलं.

लाॅकडाऊन काळात अनेकांना मानसिक, शारिरीक ताण झाला. अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील परिणाम झाला आहे. बरेच लोक आपापल्या जीवलगांपासून दूर होते. त्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव आणि दुरावा निर्माण झाला. या कारणामुळे 2020 वर्षात सर्वाधिक ब्रेकअप झाल्याचे आढळून आले.

कोरोना महामारीचा परिणाम हा लोकांच्या नात्यावर झाला आहे. अनेक कपल्स दुरावले, त्यांना भेटता आलं नाही. यावर्षी कोरोनामुळे लोक घरांमध्येच होते किंवा दुसऱ्या राज्य, देशांत अडकून पडले होते. त्यामुळे यंदाचा व्हॅलेंटाईन डे त्यांच्यासाठी खूपच खास असा आहे. अनेक कपल्स यंदाचा व्हॅलेंटाईन डे अत्यंत उत्साहात आणि वेगवेगळ्या प्रकारे साजरा करू इच्छितात.

वुमेन फर्स्ट सोशल नेटवर्किंग अॅप बंबलने देशभरातील कपल्सच्या सहभागातून नुकताच एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार, 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान दिल्लीत सर्वाधिक म्हणजेच 28 टक्के ब्रेकअप झाले. कोरोनामुळे झालेला बदल हा यामागील प्रमुख कारण आहे. 46.45 टक्के लोकांना असं वाटतं की लॉकडाऊनमुळे ते त्यांच्या जोडीदाराला भेटू शकले नाहीत, याचे पर्यावसन ब्रेकअपमध्ये झालं.

बंबल इंडिया पीआरच्या संचालक समर्पिता समद्दर म्हणतात, जे नातं योग्य रितीनं निभावलं जात नव्हतं, ज्या नात्यातून आनंद मिळत नव्हता, असे नातेसंबंध थांबवण्याची वेळ आणि धाडस महिलांना 2020 मधील घटनांनी दिलं.

2021 हे वर्ष अविवाहित महिलांसाठी नवी आशा घेऊन आलं आहे. आता त्या नव्या सामान्य स्थितीत अस्थिरतेला मागे टाकून आनंदी आणि आरोग्यदायी वर्षात पाऊल ठेवत आहेत. आमच्या अंदाजानुसार 2021च्या सुरुवातीला डेटिंगमध्ये वाढ होईल. कारण 69 टक्के लोकांचं म्हणणं आहे की ते 2021 मधील व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी डेटिंग अॅप्सचा गतवर्षीच्या तुलनेत अधिक वापर करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

जगातील सर्वात महागड्या भाजीचं आपल्या देशात होतंय उत्पादन; किंमत ऐकून व्हाल थक्क

    रिहाना पाठोपाठ ‘या’ अमेरिकन अभिनेत्रीचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा; बॉलिवूडकरांनाही फटकारलं

      शेतकरी आंदोलनावर सोनाक्षी सिन्हानं घेतली परदेशी सेलिब्रेटींची बाजू; म्हणाली….

        ‘झपाटलेला’ चित्रपटातील ‘बाबा चमत्कार’ यांचं निधन

          जाणून घ्या दररोज अक्रोड खाण्याचे आरोग्यदायी फायदे