…तर भारतात आठ लाख लोकांना झाली असती कोरोनाची लागण!

नवी दिल्ली | देशात लॉकडाऊन नसता तर आजतागायत 8 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असती, अशी भीती आरोग्य मंत्रलयाने व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिव प्रेम अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही धक्कादायक माहिती दिली.

कोरोनाग्रस्तांचा ग्रोथ रेट हा 41 टक्के होता. परंतू देशाचे पंतप्रधान यांनी मोठा निर्णय घेऊन संपूर्ण लॉकडाऊन जाहील केला. त्यामुळे कोरोना अधिक फैलावला नाही. आणि भारतावरचा धोका टळला, असं त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊनमुळे लोक घरात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा तसा जास्त धोका संभवत नाही. आणि त्याचमुळे आपण कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी झालो, असं अग्रवाल म्हणाले.

दरम्यान, 22 मार्चला देशात एक दिवसाचा जनता कर्फ्यू घेण्यात आला. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी 25 मार्चाला देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. त्यामुळे आपण कोरोनाला आटोक्यात आणू शकलो, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-इथेही राजकारण?… पी. एम. केअरमध्ये जास्त निधी येण्यासाठी मोदींची चाल

-मुख्यमंत्री महोदय कोण करतय राजकारण; निलेश राणेंचा सवाल

-सरकारला माझी मदत लागली तर मी नक्कीच देशात परतून काम करेल- रघुराम राजन

-“पंतप्रधान निधीसाठी डीडी नॅशनलवर जहिरात होतीये मग मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी का होऊ नये”

-“जयंतराव,भाजपचे हजारो कार्यकर्ते कोरोना लढ्यात, तुमचे कार्यकर्ते कुठे आहेत?