देशात कोरोनाचा धुमाकूळ… मागच्या 24 तासांत तब्बल 2 हजार लोकांचा मृत्यू!

नवी दिल्ली |  देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. दररोज 10 हजारांपेक्षा अधिक रूग्ण मिळत असताना आता मागच्या 24 तासांत 2003 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतापुढची चिंता अधिकच वाढली आहे.

गेल्या 24 तासांत देशात 10 हजार 974 नव्या कोरोना बाधित केस समोर आल्या आहेत. त्यामुळे भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या साडे तीन लाखांपेक्षा अधिक झाली आहे. आतापर्यंत 3 लाख 54 हजार 65 रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

देशात सध्या 1 लाख 55 हजार 227 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 86 हजार 935 रूग्णांन डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

 

 

दुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. दररोज तीन ते साडे तीन हजार रूग्णांच्या जवळपास नव्या कोरोनाबाधितांची वाढ होतो आहे.महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ज्या घरासमोर आंदोलन त्याच घरातून आमदारकी, राजू शेट्टी म्हणतात…

-“पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का?, ते नेमकं काय लपवत आहेत?”

-भारत आणि चीनच्या सैन्यात का झाला वाद?, घटनास्थळी नेमकं काय काय घडलं???

-भारत-चीन सीमेवरील झटापटीनंतर चीनकडून अधिकृत निवेदन

-मुनगंटीवारांचं शिवसेना प्रेम पुन्हा गेलं ऊतू, म्हणाले शिवसेनेचा त्याग….