“राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 1135, महाराष्ट्र अद्याप स्टेज 3 मध्ये नाही”

मुंबई | महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांची संख्या 1135 वर पोहचली आहे तर आजपर्यंत 120 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.

मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जर बाहेर पडावं लागत असेल किंवा कोणत्याही कारणासाठी बाहेर पडायचं असेल तर मास्क वापरणं सक्तीचं आहे, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र अद्याप स्टेज 3 मध्ये नाही. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती नियंत्रणात आहे, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

सोशल डिस्टन्सिंग सगळ्यांनी काटेकोरपणे पाळावं असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात करोनाबाधितांचा मृत्यूदर 6 टक्के आहे. हा दर सरासरीपेक्षा जास्त आहे, असंही टोपेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘माझ्यावर प्रेम असेल तर एवढचं करा…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच आवाहन

-लॉकडाऊन काही भागात शिथील करता येईल का?, पवारांची मोदींना विचारणा

-कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी तीन प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

-“14 एप्रिलनंतर लॉकडाउन पूर्णपणे उठवणार नाही”

-“केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको”