राज्यात आज 8381 रूग्ण ठणठणीत होऊन घरी… बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येचा आज उच्चांक!

मुंबई | कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला आहे. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

७३५८ रुग्ण मुंबई मनपा क्षेत्रातील असून एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे,  आतापर्यंत २६९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, असं त्यांनी सांगितलं

राज्यात आज 2682 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 62228 अशी झाली आहे. आज नवीन 8381 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26997 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 33124 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, असं टोपे यांनी सांगितलं.

दुसरीकडे 31 मे रोजी देशव्यापी चौथा लॉकडाऊन संपणार आहे. मात्र मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी लक्षात घेता या शहरातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाविरोधातील लढाईत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अजित पवार यांची मोठी घोषणा

-कुख्यात डॉन अरुण गवळीबाबत नागपूर न्यायालयाचा मोठा निर्णय!

-देवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ

-पुण्यात आज 186 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, वाचा किती नवे रूग्ण मिळाले…

-‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी