“जामीन हवा असेल तर PM Cares Fund साठी 35 हजार द्या”

रांची | भाजपचे माजी खासदार सोम मरांडी यांच्यासहीत सहा लोकांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र यासाठी न्यायलयाने अर्जदारांसमोर दोन अटी ठेवल्या. न्यायालयाने या सहा जणांना केंद्र सरकारचे ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाउनलोड करायला सांगितलंय.

कोर्टाने या सहा जणांना करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पीएम केअर्स निधीसाठी प्रत्येकी 35 हजार रुपये द्यावेत असंही स्पष्ट केलं आहे. तसेच हा निधी दिल्याचे पुरावे न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

उच्च न्यायलयातील सुनावणीदरम्यान आम्ही न्यायालयाची कोणतीही अट मान्य करण्यास तयार आहोत, फक्त आमची शिक्षा रद्द करावी तसेच जामीन मंजूर करावा अशी मागणी या सहा जणांनी केली होती.

न्यायमूर्ती अनुभव रावत चौधरी यांनी घेतलेल्या सुनावणीमध्ये सर्वच्या सर्व सहा जणांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करणं आणि पंतप्रधान मदतनिधीसाठी प्रत्येकी 35 हजार रुपये द्यावेत, अशा दोन अटी ठेवल्या. तसेच निधी दिल्याचा पुरावा सादर केल्यानंतर या सहा जणांना सोडण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-संयुक्त राष्ट्र प्रमुखांचा भारताला ‘सलाम’; मदतीचा हात दिल्याबद्दल कौतुक

-“पण तीन महिन्यानंतर, तीन महिन्याचे पैसे माणसाने आणायचे कुठून???”

-संजय राऊत यांच्या अग्रलेखाची इतिहासात नोंद होईल- काँग्रेस

-“20 तारखेपासून मोजके उद्योग-व्यवसाय सुरू होणार मात्र अटी शर्थी पाळाव्या लागणार”

-उसतोड कामगारांचा घरी परतण्याचा मार्ग कुणी मोकळा केला?; मनसे अन् धनंजय मुंडेंमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू!