लॉकडाउनला ठेंगा! भाजप आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न

बंगळुरू | संकटाचा काळ असून कुणीही घराबाहेर पडू नये. गर्दीचे कार्यक्रम टाळा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. पण भाजप आमदारानेच लॉकडाउनला ठेंगा दाखवला आहे. विषेश म्हणजे तीन हजार पाहुण्यांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची विशेष उपस्थिती होती.

देशात लॉकडाउन असताना कर्नाटकातील भाजपाचे आमदार महंतेश कवतागिमठ यांनी आपल्या मुलीचं थाटात लग्न लावून दिलं. बेळगावमध्ये रविवारी हा लग्नसोहळा पार पडला. ‘द हिंदू’ दैनिकानं यासंदर्भात वृत्त दिलं आहे

कोरोनाचं संकट टळेपर्यंत लग्न सोहळे आयोजित करून नका, असं आवाहन करणाऱ्या येडियुरप्पा यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.

देशात लॉकडाउन लागू झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी राज्यातील जनतेला सर्व लग्न सोहळे पुढे ढकलण्याचं आवाहन केलं होतं. हे संकट टळेपर्यंत विवाह टाळावं, असं येडियुरप्पा यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात होणार ‘इतकी’ कपात

-मी अनेकदा बँकांना सर्व पैसे देण्याची ऑफर दिली होती पण…- विजय मल्ल्या

-“असंही एक दिवस मरणारच आहोत, त्यासाठी देश लॉकडाऊन करू शकत नाही”

-“मोदीजींना स्वतःबद्दल गैरसमज आहे त्यांना देश समजला नाही… त्यामुळे माफी मागून काहीही फरक पडणार नाही”

-कोरोनाच्या संकटात BSNLच्या ग्राहकांना गुडन्यूज; वैधता वाढली, इतक्या रुपयांचं रिचार्जही मोफत