देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पंधरा दिवसांत एक लाखावरून दोन लाखांवर

मुंबई | देशातील कोरोनग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या संख्येने 2 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये देशातील करोनाग्रस्तांची संख्या 1 लाखावरून 2 लाखांवर गेल्याची माहिती आहे.

देशात पहिला रुग्ण केरळमध्ये 30 जानेवारी रोजी आढळला होता. कोरोना व्हायरसचं केंद्र ठरलेल्या वुहानमधून परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हा व्हायरस आढळला होता. त्यानंतर मार्च महिन्यात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली.

10 मार्चला भारतात 50 करोना रुग्ण होते. त्यानंतर सुरू झालेली कोरोनाग्रस्तांच्या संख्येतील वाढ अद्याप थांबलेली नाही.त्यानंतर सुरू झालेली कोरोनाग्रस्तांच्या संख्येतील वाढ अद्याप थांबलेली नाही. 18 मे रोजी ही संख्या 1 लाखांवर पोहोचली होती. म्हणजेच देशात 110 दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या एकावरून एक लाखावर गेली होती. आता गेल्या पंधरा दिवसांत या एक लाख रुग्णांमध्ये आणखी एक लाख रुग्णांची भर पडली आहे.

रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी कोरोना व्हायरसचा प्रसार कमी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांचा फायदा होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. शिवाय देशातील कोरोनाग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाणही वाढल्याचे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोना संपल्यानंतर मी राज्यभर दौरा करणार- पंकजा मुंडे

-देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश

-“आभाळ जरी कोसळलं तरी…, महाराष्ट्रा काळजी घे”

-चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलं नाही, तरीही पुढील 2-3 तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात

-“आप्पा… तुम्ही अंगीकारलेला लोकसेवेचा वसा मी पुढे सुरू ठेवणार हा माझा शब्द”