प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न ठरला यशस्वी…!

नागपूर | नागपूर शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन त्यानुसार आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेऊन विभागातील 5 हजार 808 तज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सज्ज ठेवण्यात आले आहे. त्यामुळे देशातच नव्हे तर राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यात यश आले आहे.

नागपूर विभागात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नागपूरसह पाचही जिल्ह्यांच्या भविष्यातील उद्भवणाऱ्या परिस्थितीचा तसेच लोकसंख्येचा अभ्यास करुन त्यानुसार सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणासाठी विभागस्तरावर तयार करण्यात आलेल्या वैद्यकीय सुविधांच्या आराखड्यानुसार 393 तज्ज्ञ डॉक्टर, 1 हजार 957 डॉक्टर, 2 हजार 488 परिचारिका व 970 वर्ग चारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. अशा प्रकारे प्रशिक्षण देऊन तज्ज्ञ वैद्यकीय मनुष्यबळ केवळ विभागात उपलब्ध झाले आहे.

कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटरपासून स्वतंत्र कोविड एअर सुसज्ज रुग्णालय तयार करण्याचा समावेश आहे. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, वर्ध्याच्या सावंगी मेघे वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे.

कोविड रुग्णांवर उपचारासाठी प्रशिक्षित आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा अभ्यास करुन त्यानुसार राज्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर चालविण्यासह इतर आवश्यक प्रशिक्षण देऊन तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून सोलापूर महापालिका आयुक्त दिपक तावरे यांची बदली, त्यांच्या जागी या अधिकाऱ्याची वर्णी

-लस शोधली तरी…. कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर

-ही 13 शहरं अजूनही बंदिस्त राहणार, बाकीकडे लॉकडाऊन शिथील होणार…!

-खाजगी डॉक्टरांसाठी ठाकरे सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

-चीनवर आरोप करताना डोनाल्ड ट्रम्प संतापले, घेतला ‘हा’ मोठा निर्णय