संकटाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज; 40,000 नागरिकांना हलवलं

मुंबई | निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढत असताना हे वादळ पुढे पुढे सरकत आहे. काही तासात रायगड आणि मुंबई किनाऱ्यावर धडकू शकते. दरम्यान, वादळाचा धोका लक्षात घेऊन आतापर्यंत विविध ठिकाणाहून 40 हजार लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे.

एनडीआरएफच्या दलाने या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. तसेच मुंबईतील वर्सोवा बीचवर एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून 190 किमी दूर आहे. हे वादळ आता हळूहळू पुढे सरकत आहे. काही तासांत ते किनाऱ्यावर धडकू शकते, अशी स्थिती आहे.

बीएमसी, एनडीआरआफ, अग्निशमन दल हायअलर्टवर आहे. हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईमध्ये सकाळच्या प्रहरात वाऱ्याचा वेग कमी होता. मात्र काही अंशी वाऱ्याचा वेग वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुढील सहा तासांत चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार- हवामान विभाग

-सरकारच्या सूचनांचं पालन करा, बाहेर पडू नका; सुप्रिया सुळेंचं जनतेला आवाहन

-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्रीवादळात प्रशासनासोबत मदतीला उभं रहावं- शरद पवार

-‘कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’; उद्धव ठाकरेंसाठी केजरीवालांचं ट्विट

-2020 वर्ष निराशाजनक, घाबरु नका संकटाचा सामना करा- अक्षय कुमार