देशात कायद्यापेक्षा राजकीय सूडबुद्धी वरचढ ठरतीये- डी.के. शिवकुमार

नवी दिल्ली : काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे डी.के. शिवकुमार यांना ईडीने मंगळवारी अटक केली आहे. शिवकुमार हे सध्या ईडीच्या कोठडीत असून, त्यांनी कोठडीतूनच एक व्हीडिओ शेअर केला आहे. देशात कायद्यापेक्षा राजकीय सूडबुद्धी वरचढ ठरत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

आर्थिक गैरव्यवहारावरुन कर्नाटकतले काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांना ईडीने अटक केली. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यापाठोपाठ केंद्रीय तपास यंत्रणानी अटक केलेले शिवकुमार हे दुसरे काँग्रेस नेते आहेत.

शिवकुमार यांनी कारवाईमागे राजकीय द्वेष असल्याचा आरोप केला आहे. तसेच या देशात कायद्यापेक्षा राजकीय सूडाची प्रवृत्ती अधिक शक्तीशाली झाली आहे, असं शिवकुमार म्हणाले आहेत.

शिवकुमार यांना अटक झाल्यानंतर कर्नाटक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवकुमार यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ राज्य काँग्रेसच्या वतीने बुधवारी कर्नाटक बंद पाळण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-