मगर आपली शिकार खूप हुशारीने करत असते, वाघ, बिबट्या, हरिण अशा प्राण्यांना एकाच हल्ल्यात ठार करते. असाच काही दिवसांपूर्वी मगर आणि बिबट्या यांचा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ एकंदरीत असा होता की, एका तलावात बिबट्या पाणी पित असतो. त्या ठिकाणी मगर येते व त्या बिबट्याला आपल्या जबड्यात पकडून पाण्यात खेचून घेवून जाते.
त्यानंतर आणखी व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र, तो व्हिडीओ याच्या उलट त्या व्हिडीओमध्ये बिबट्या तलावात जावून मगरीला आपल्या जबड्यात गच्च पकडून पाण्यातून बाहेर आणतो. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओवर वेगवेगळे स्टेटस बनवण्यात आले.
असाच काहीसा व्हिडीओ मगर आणि शार्क माश्याचा आता व्हायरल होतोय. आता मगरीने शार्क माश्याची शिकार केली आहे. काही क्षणांत शार्कला गिळंकृत करणाऱ्या मगरीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. सोशल मिडियावर व्हायरल होणारा शार्क आणि मगरीचा हा व्हिडीओ आॅस्ट्रेलियातील असल्याचं सांगितलं जातयं.
समुद्रकिनाऱ्यावर पाण्यातून एक भलीमोठी मगर येते आणि किनाऱ्यावरील शार्कला आपली शिकार बनवते. युवोन्ना पालमेर नावाची व्यक्ती रविवारी सुदूर उत्तर क्वींसलॅंडच्या कॅसोवारी समुद्रकिनाऱ्यावर मासे पकडण्यासाठी गेली होती. तेव्हा कॅमेऱ्यात तिने हे दृश्य कैद केलं.
Ryan Moody Fishing या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. समुद्रातून एक भलीमोठी मगर बाहेर येते. समुद्रकिनारी दोन शार्क बसलेले आहेत. मगर त्यांच्या दिशेनं येते आणि एका शार्कला आपल्या जबड्यात घेते.
शार्क मगरीच्या तोंडात तडफडतानाही दिसते. पण पाहता पाहता मगर त्या शार्कला गिळंगृत करते. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, पालमेरने सांगितलं का, तीने या शार्कला पकडलं होतं. त्यांना ती पुन्हा पाण्यात सोडणार होती. मात्र तितक्यात समुद्रातून मगर आली आणि तिने त्या शार्कला खाल्लं. त्यामुळे ती त्या शार्कला पाण्यात सोडू शकली नाही
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा; फोटो व्हायरल
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज… आता आला ‘सीएनजी’वर चालणारा ट्रॅक्टर
अबब… सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण!
‘पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणात ‘हा’ शिवसॆना मंत्री’; चित्रा वाघ यांचा धक्कादायक आरोप !