148 चेंडूंमध्ये 257 धावांचा पाऊस; रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात वाचला

सिडनी : आॅस्ट्रेलियातील देशांतर्गत वनडे सामन्यात एक आगळावेगळा पराक्रम घडला आहे. डार्सी शाॅर्ट या फलंदाजाने हा पराक्रम केला आहे. शॉर्ट पराक्रमाची तुलना करायची झाल्यास भारताचा कर्णधार रोहित शर्मासोबतच त्याची तुलना करावी लागेल. या खेळाडूनं असा काय पराक्रम केला? असा सवाल नक्कीच तुमच्या मनात आला असेल. या खेळाडूने 148 चेंडूंमध्ये तब्बल 257 धावा कुटल्या आहेत. या खेळीत त्याने 23 षटकार आणि 15 चौकारांची बरसात केली आहे. डार्सी शॉर्टच्या या खेळीची जगभरात चांगलीच चर्चा आहे. 

क्विन्सलँड संघाने नाणेफेक जिंकत वेस्टर्न आॅस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्टर्न आॅस्ट्रेलियाला लवकरच मोठा धक्का बसला. जोश एलिंश अवघ्या 4 धावांवर बाद झाला. जोश बाद झाल्यानंतर डार्सी शाॅर्ट मैदानावर आला आणि सामन्याची सर्व सुत्रं त्याने आपल्या हातात घेतली. तो आल्यापासून त्याने गोलंदाजांची अक्षरक्षः कत्तल करण्यास सुरुवात केली. डार्सी शाॅर्टचा वेस्टर्न आॅस्ट्रेलिया 47  षटकांत 387 धावांवर सर्वबाद झाला. या 387 धावांमधील 257 धावा एकट्या डार्सी शाॅर्टने केल्या होत्या.

डार्सी शाॅर्ट आणि संघातील दुसऱ्या सर्वोत्तम धावा करणाऱ्या खेळाडूंच्या धावांतील फरक हा तब्बल 230 धावांचा होता. मार्क्स स्टोनिकने या सामन्यात दुसरी सर्वोत्तम धावसंख्या करताना केवळ 27 धावांची खेळी केली. डार्सी शाॅर्ट आॅस्टेलियाकडून आजपर्यंत 3 वन-डे आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने फेब्रुवारी 2018 मध्ये टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. 

रोहित शर्माने ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये एकट्याने 264 धावा केल्या आहेत. डार्सी शॉर्टची खेळी ही ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमधील दुसरी सर्वोच्च खेळी ठरली आहे. डार्सी शॉर्ट बाद झाल्यानं रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात वाचला. यापुर्वी अॅलस्टेर ब्राॅऊनने 2002 साली 268 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने 2014 साली 264 धावा केल्या आहेत. 

पाहा डार्सी शॉर्टची खेळी-