“…तर सोमय्यांची हत्याच झाली असती”; भाजप नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

मुंबई | राज्यात सध्या भोंगे, हनुमान चालीसा या विषयांवरून जोरदार गोंधळ होत असल्याचं दिसत आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबईत जोरदार वाद झाला होता.

नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना पोलीस स्थानकात भेटण्यासाठी गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला झाला होता. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील वाद आणखीनच वाढला आहे.

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्यात सोमय्या यांच्या हनुवटीवर मार लागला. सोबतच्या सुरक्षा व्यवस्थेमुळं सोमय्या वाचले, असं वक्तव्य भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे.

सोमय्यांवर हल्ला झाला त्यावेळी राज्य सरकारनं बघ्याची भूमिका घेतली. ही घटना लोकशाहीसाठी मारक आहे, असं वक्तव्य करत दरेकर यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

राज्य सरकारच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करत आहे. केंद्राच्या सुरक्षिततेवर प्रश्न करणे हे चुकीचं आहे, असंही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

झेड सिक्युरिटी नसती तर भाजप नेते किरीट सोमय्या यांची हत्या झाली असती, असा गंभीर आरोप देखील यावेळी दरेकर यांनी केला आहे. भाजप शिष्ठमंडळानं राज्यपालांंची भेट घेत सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली.

सांताक्रुझ पोलीस स्थानकात दाखल झालेला बोगस एफआयआर रद्द करावा. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांची चौकशी करण्यात यावी, असंही दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, दरेकर यांच्या आरोपांमुळं आता परत एकदा मुंबई पोलीस आणि सीआयएसएफ यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. कारण सोमय्या यांना केंद्र सरकारनं सीआयएसएफ सुरक्षा पुरवलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 अनिल देशमुखांची जेलमधून सुटका होणार?; महत्त्वाची माहिती समोर

रक्त की टोमॅटो सॉस?; सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर 

“मी स्वप्नवत नेता आहे, मी काम केलं नाही तर लोक मारतील” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; महत्त्वाची माहिती आली समोर 

“किरीट सोमय्या भाजपचे नाच्या आहेत, आणि देवेंद्र फडणवीस….”