चार महिन्यात सोलापूरला राष्ट्रवादीचा तिसरा पालकमंत्री

सोलापूर | चार महिन्यात सोलापूरला राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा पालकमंत्री मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.

राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर सोलापूरचे पालकमंत्री म्हणून मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. वळसे पाटलांनंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर आव्हाड यांनी तातडीने सोलापुरात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनेचा आढावा घेतला. त्यानंतर मुंबईला परतल्यानंतर आव्हाड यांनी स्वत:ला होम कोरंनटाईन करून घेतल्याचं सांगण्यात आलं.

सोलापुरात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्र्यांची गरज भासू लागल्याची मागणी वाढल्यावर तिसरा नवीन पालकमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला आहे. पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सोलापूरच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहीन, असं दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-Good News… कोरोनावर लस शोधल्याचा ऑक्सफर्डचा दावा!

-आपण लढणार आपण जिंकणार; मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ मेसेज

-मोदी सरकारने देशाचा विश्वासघात केलाय; अखिलेश यादवांची टीका

-असदुद्दीन ओवैसींच्या मुखी पहिल्यांदाच मोदी सरकारचं कौतुक; म्हणाले…

-फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवले ‘एवढे’ हजार कोटी