“मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार कराल तर जेलमध्ये टाकायलासुद्धा शासन मागेपुढे पाहणार नाही”

मुंबई |  कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अत्यावश्यक बनलेल्या मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार सुरू झाला आहे. मात्र असा जर कुणी काळाबाजार करत असेल आणि ते जर शासनाच्या निदर्शनास आलं तर त्यांना जेलमध्ये टाकायलासुद्धा शासन मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. (DCm Ajit Pawar Warning Black Marketing Hoaders)

मुंबईमध्ये मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार उघडकीस आला आहे. दुकानदार मास्क आणि सॅनिटायझरचा साठा करत होते आणि साठा करून चढ्या भावाने विकत होते. साहजिकच ग्राहकांसाठी ही किंमत अतिशय उच्च होती. आज मुंबईमध्ये काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (DCm Ajit Pawar Warning Black Marketing Hoaders)

संकटाच्या कठीण काळात असे प्रकार अजिबात व्हायला नकोत. उलट या काळात सगळ्यांनी सगळ्यांशी माणुसकीने वागलं पाहिजे. जर या ही काळात कुणी पैसे कमवण्याच्या उद्देशाने असले प्रकार करत असतील तर शासन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करेल, असं ते म्हणाले आहेत. (DCm Ajit Pawar Warning Black Marketing Hoaders)

दरम्यान, शासन संपूर्ण ताकदीने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी काम करत आहेत. जनतेने देखील शासनाला सहकार्य करावं, अशी विनंती त्यांनी केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

-‘मी समाजाचा शत्रू आहे’, बाहेर फिरणारांच्या हातात पोलिसांनी दिले बोर्ड!

-शेतकऱ्यांच्या मदतीला शरद पवार धावले; केंद्रीय मंत्र्यांकडे केली विनंती

-“हे ही दिवस जातील… माणुसकी आणि नैतिकता सोडू नका”

-महाराष्ट्रातले 15 कोरोना पेशंट ठणठणीत बरे झाले आहेत; आरोग्य यंत्रणेला मोठं यश

-“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”