“केसरकर जास्त बोलू नका, तुमची लायकी काय हे आम्हाला माहिती, कशाला उड्या मारता”

मुंबई | तुम्ही शिंदेसाहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची अवस्था मतदारसंघात काय केलीय हे आम्हाला माहिती आहे. कशाला उड्या मारता. मतदारसंघात तुमची काय लायकी आहे हे माहिती आहे. त्यामुळे लायकीत रहायला शिका, असा सज्जद दम भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांना दिला आहे.

नारायण राणेंची दोन्ही मुलं लहान असून त्यांना समज देण्याची गरज आहे, असं वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिल्लीत दौऱ्यावर असताना केलं होतं. याला निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून व्हिडीओ प्रसारित करून सडेतोड उत्तर दिलं आहे.

राणेंच्या याच दोन मुलांनी तुमची नगरपालिका घेतली. आमच्याकडे जिल्हा परिषद आहे, तुमचे पंचायत समिती सदस्य आमच्याकडे आहेत, ग्रामपंचायती आहेत. तुमची लायकी आम्हाला माहिती आहे. केसरकर कशाला उड्या मारता, अशा शब्दांत निलेश राणेंनी केसरकरांना सुनावलं आहे.

तुम्हाला राजकिय जीवनदान मिळाले आहे. त्यामुळे इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका. आम्ही काय गप्प बसणार नाही. ज्या भाषेत सांगाल त्या भाषेत तुम्हाला उत्तर देण्याची आमची तयारी आहे. पण, वातावरण खराब करू नका, अशी टीका त्यांनी केला.

आपण एका युतीमध्ये आहोत, जेवढी युती टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, तेवढीच ती तुमच्यावरही आहे, असं निलेश राणे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“नवाब मलिकांनी केलेल्या कामाची दखल संपूर्ण देशाने घेतली” 

“नशीब उरलेल्या खेळांडूंचा कॅप्टन अजून बोलला नाही, अगला राष्ट्रपती हमारा होगा” 

‘राजनाथ सिंहांचा फोन आला आणि म्हणाले अस्सलाम वालेकुम’, उद्धव ठाकरेंचा खुलासा

‘मला ईडी आली नाही पण फक्त…’, बंडखोरीनंतर शीतल म्हात्रेंचं स्पष्टीकरण

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीचा मोठा दावा, रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ