दिल्लीच्या निकालावर मोदींचं ट्वीट… केजरीवालांचं लगोलग उत्तर!

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. 70 जागांपैकी आप 63 जागांवर विजयी झालं आहे तर भाजपला 7 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दिल्ली विधानसभेचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे.

अरविंद केजरीवाल यांचे खूप खूप अभिनंदन… , दिल्लीकरांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना शुभेच्छा असं ट्वीट मोदींनी केलं आहे. दिल्लीत मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी केजरीवालांचं अभिनंदन केलं आहे. त्यांच्या या ट्वीटला केजरीवालांनी लगोलग रिप्लाय केला आहे.

थँक्यू सो मच सर…. दिल्लीला जागतिक स्तराचे शहर बनवण्यासाठी अत्यंत जोरकसपणे काम करत आहे आणि काम करत राहिन, असं ट्वीट केजरीवाल यांनी केलं आहे.

दुसरीकडे दिल्ली निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाहीये. आपच्या झाडूने काँग्रेसचा सुफडासाफ केला आहे. काँग्रेसची एवढी दयनीय अवस्था झालीये की 67 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-‘फॅसिजमचा शत्रू तो आपला मित्र’… आव्हाडांनी खास शैलीत केलं केजरीवालांचं अभिनंदन!

-….असा राजा आहे ज्याच्याकडे ‘राजधानी’च नाही; चाकणकरांनी उडवली मोदींची खिल्ली

-दिल्लीच्या तख्तावर पुन्हा केजरीवाल बसल्यानंतर मोदी ट्वीट करून म्हणाले….

-“आमच्या 3 जागा होत्या… आता 3 पेक्षा जास्त आल्यात, आमचा विजय झालाय”

-केजरीवालांच्या ‘झाडू’ने काँग्रेस सपाट; 67 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त!