मुंबईत 8 नगरसेवकांचे 60 झाले पाहिजेत… कामाला लागा; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई |   मुंबई महानगरपालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मुंबईत आजच्या घडीला राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत. येणाऱ्या काळात असं काम करा की 8 नगरसेवकांचे 60 नगरसेवक झाले पाहिजेत, असे आदेश अजित पवारांनी आज कार्यकर्त्यांना दिले.

अजित पवार मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

अजित पवार म्हणले-

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात मुंबई महानगरपालिका एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत आपण एकत्र लढणार आहोत. मुंबईत आजच्या घडीला राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत. येणाऱ्या काळात असं काम करा की 8 नगरसेवकांचे 60 नगरसेवक झाले पाहिजेत.

“मुंबईमध्ये काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांना मला सांगायचंय की जास्तीत जास्त आमदार निवडून कसे आणता येईल, याकडे लक्ष द्या. मुंबईतमध्ये 30 ते 35 जागा आहेत. त्यामध्ये कमीत कमी 10 आमदार तरी निवडून आले पाहिजेत”, असं ते म्हणाले.

“कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनो मुंबईत आपल्याला राष्ट्रवादीला एवढं मजबूत करायचं की ज्यावेळी मुंबई महानगरापालिकचं जागावाटप होईल त्यावेळी शिवसेनेला आपल्याला बरोबरीच्या जागा मागता येतील”, असंही अजित पवार म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीने मेगाप्लॅन आखला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्र्यांना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुंबईतला आठवड्यातील एक दिवस देण्यासंबंधी सूचना केल्या आहेत. शरद पवारांच्या आदेशानुसार खासदार सुप्रिया सुळे आठवड्यातील एक दिवस मुंबईसाठी राखून ठेवणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-आजही पळता भुई थोडी होईल जरा हिशोबात रहा; चाकणकर चित्रा वाघ यांच्यावर संतापल्या

-महाराष्ट्राच्या लेकीला मिळाला लष्करात उच्चपदावर पोहोचणाऱ्या पहिला महिला अधिकाऱ्याचा मान!

-हवेत उडी घेत सुपरम‌ॅनने घेतला जबरदस्त झेल; पाहा व्हिडीओ

-दैनिक ‘सामना’ची धुरा आता रश्मी ठाकरेंच्या हातात

-बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर च्या अडचणीत वाढ; देशद्रोहाची तक्रार दाखल