कोर्टात जाताना हिंगणघाटच्या आरोपीने व्यक्त केली बायकोला आणि मुलीला भेटण्याची इच्छा

वर्धा (हिंगणघाट) | वर्धातल्या हिंगणघाटच्या तरूणीला जिवंत जाळण्याच्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरलाय. पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देतीये. आरोपीची 5 दिवसांची पोलिस कोठडी आज संपलीये. आज त्याला कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याने आपल्या बायकोला आणि मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. अवघ्या 12 दिवसांपूर्वी त्याला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.

आज विकेश नगराळे याला न्यायालयात हजर करण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्याला सकाळी 6 वाजताच न्यायालयात आणलं होतं. पोलिसांनी अतिशय गुप्तता बाळगत त्याला न्यायालयात आणलं. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, याची पुरेपुर दखल पोलिसांनी यावेळी घेतली.

आरोपीविरोधात जनसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य आणि महिला त्याला नागरिकांच्या हवाली करा, त्याला नागरिकच योग्य शिक्षा करतील किंबहुना त्याला चौकात फाशी द्या, अशी मागणी करू लागल्या आहेत. आरोपीविरोधातला रोष लक्षात घेता पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळत त्याला न्यायालयात आणलं. यावेळी हिंगणघाट न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, कोर्टाने आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली आहे. गरज भासली तर पुन्हा एकदा आरोपीला पोलिस कोठडी मिळू शकते, असं कळतंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-शालिनीताईंचा अजित पवारांशी पंगा; तात्काळ सत्तेवरून हटवण्याची राज्यपालांकडे मागणी

-मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी ‘आप’ला मतदान करा; मतदानादिनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं ट्वीट

-काश्मिरची सुरक्षा महत्त्वाची… इंटरनेट हा मुलभूत अधिकार नाही- प्रसारण मंत्री

-मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ‘ती’ घोषणा फसवी!

-रंगेल महाराज भागवत कथा सांगायला आला अन् गावातल्या बाईला नादी लावून तिला घेऊन पळाला!