देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

मुंबई | महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा पेच सुटण्याची चिन्ह असताना राजकारणात एक नवीन ट्विस्ट पहायला मिळालेला आहे. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. त्यांच्या निर्णयाने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. 

मुख्यमंत्रिपदावर कुणाचंही दुमत नाही. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झालं आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील असं सुचवंल होतं. मात्र आता सत्तासमिकरणं पूर्णपणे बदलली आहेत. 

दरम्यान, आता राज्याच्या राजकारणात काय-काय घडतं, हे पाहणं महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या-