“महाविकासआघाडी सरकारमध्ये कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही, अनैसर्गिक युतीची सत्ता जास्त काळ टीकत नाही”

मुंबई | विधीमंडळाकडून पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला गोचीत अडकवण्याचा प्रयत्न करणार आहे. याच  पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक आंतरविरोध आहे एकंदरित हे सरकार आंतरविरोधानेच भरलेलं आहे. त्यामुळे आम्ही सरकारकडे लक्ष देत नाही.  कारण या सरकारमध्ये कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही त्यामुळे हे सरकार चालायचं तितके दिवस चालेल एक दिवस जाईल, त्यामुळे ते काय बोलतात हे महत्वाचं नाही. अनैसर्गिक युतीची सत्ता देशात जास्त काळ टिकली नसल्याचं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेसच्या आमदारांना निधी दिला जात नाय्ये. विरोधी पक्षालाही काहीही देण्यात आलेलं नाही आणि महत्वाचं म्हणजे आमच्या आमदारांची आधी मंजूर झालेली काम आता रद्द करण्यात येत आहेत. जर या प्रकरणी न्याय न दिल्यास आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

केंद्राने दिलेले निर्णय राज्य सरकार राज्यात लागू करत नाही. ई-पासच्या मुद्द्यावर राज्य सरकारची विसंगती दिसत आहे. कारण एसटीला पास नाही आणि खाजगी वाहनांना का?, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे .

काँग्रेस पक्षाला सध्या आत्मचिंतनाची गरज आहे त्यांनी आत्मचिंतन करावं. काँग्रेस पक्षाला त्यांचा अध्यक्ष ठरवता येत नसल्याचं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसला टोला लगावला. यावेळी फडणवीस सुशांतच्या प्रकरणावरही बोलले.

सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे त्यामुळे लवकरात लवरकर सत्य समोर येईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

दरम्यान, दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाची गोची करण्याचा प्रयत्न करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

वेगाच्या बादशहालाही कोरोनाने पकडलं; धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण, पार्टीला उपस्थित ख्रिस गेलचा रिपोर्ट आला…

सरकारमधील ‘या’ मंत्र्याने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

रियासोबत झाल्यानंतर आता अमिताभसोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या गळ्यात हात घातलेला भट यांचा व्हिडीओ व्हायरल!

‘हे’ काँग्रेसचं आधारकार्ड असून राहुल गांधी उत्तम नेते आहेत- संजय राऊत

यावर्षीचा आयपीएल थरार पहा फ्रीमध्ये! जिओने खास आयपीएलसाठी आणले हे दोन प्लॅन; जाणून घ्या!