मोदींनी केलेल्या आवाहनानुसार आज सर्वांनी वीज घालवली तर अडचण येईल का?; फडणवीस म्हणाले…

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नऊ मिनिटे दिवे बंद करण्याचं आवाहन केलं आहे. यावरून मोठा वादंग पाहायला मिळाला. मोदींवर अनेक राजकीय नेत्यांनी टीका केल्या. यावर मोदींनी केलेल्या आवाहनानुसार आज सर्वांनी वीज घालवली तर अडचण येईल का?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला असता यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

आपण केवळ लाईट बंद करतोय. बाकी सगळी उपकरणं सुरू असतील. संध्याकाळी अंधार पडल्यावर पूर्ण देशातले दिवे लागतात. तेव्हा ग्रिडवर लोड येत नाही. काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत धादांत खोटं आणि चुकीचं बोलत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वर्ल्ड अर्थ डेला रात्री 8.30 वाजता 50 देशांतले लोक पूर्णतः विजेचा वापर बंद करतात. तरीही ग्रिड फेल झाल्या नाहीत. केवळ मोदींना विरोध करण्यासाठी हे बोललं जातं, असं फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी ठाकरे सरकार करत असलेले प्रयत्न घेत असलेले निर्णय अपुरे आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये  समन्वय नाही, अशी टीकाही  फडणवीस यांनी केली.

 

महत्वाच्या बातम्या –

-उद्धव ठाकरे सरकारचे निर्णय अपुरे, मंत्र्यांमध्ये समन्वय नाही- देवेंद्र फडणवीस

-“दहावीच्या भूगोलाच्या पेपरची परीक्षा आता रद्दच करा”

-कोरोना बरा होण्यासाठी दररोज गाढविनीचं दूध प्या; या नेत्यानं तोडले अकलेचे तारे

-सांगलीत जयंत पाटलांनी सूत्र हाती घेताच कोरोना आटोक्यात

-आज जर दिवा किंवा मेणबत्ती लावणार असाल तर सरकारने केलेलं आवाहन नक्की वाचा…