“बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील”

नांदेड | महाविकास आघाडीतील लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहेत. सामान्य माणसाची अवस्था वाईच आहे. अतिवृष्टीत मोठं नुकसान झालं पण या सरकारने रुपयांची मदत केली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. पण यांचे पैसे सरकारला मिळत नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर केलीये.

पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे इतके लबाड आहेत की काहीही झालं की केंद्रावर ढकलतात. बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं असं सांगतील, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली आहे.

खरं म्हणजे ही पोटनिवडणूक आली नसती तर बरं झालं असतं. मात्र, ही निवडणूक आल्यावर या माध्यमातून इथल्या मतदारांना एक संधी मिळालीय. राज्य सरकारच्या कामावर नापसंती व्यक्त करण्याची ही संधी मिळतेय. या सरकारने 2 वर्षात राज्यात केवळ भष्ट्राचार केला. प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा लाख लोकांना घरं दिली, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

गॅस सिलिंडर मिळालं पाहिजे. पण या सरकारनं गरीबाला एकही घर दिलं नाही. फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरु आहे. आयकर खात्याच्या घाडीत हजारो कोटी सापडले आहेत. ते जमा करताना सगळा हिशेबही ठेवलाय, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

दरम्यान, आमच्या काळात पाच वर्षात एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापलं नाही. एकाही शेतकऱ्याची त्याबाबत तक्रार नाही. मात्र, या सरकारमध्ये सर्रास वीज कापली जात आहे. नांदेडमध्येही हे फक्त पोटनिवडणुकीसाठी थांबले आहेत. एकदा पोटनिवडणूक होऊ द्या, मग इथेही वीज कट करायला येतील, असंही फडणवीसांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“मोदी सरकारने लसीकरणाच्या शंभरीनंतर आता इंधनाची शंभरी साजरी करावी”

“सत्तेसाठी काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करु नये”

सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर

“सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री है”

काय सांगता! चक्क गाडीचालकाविना धावतीय दुचाकी, पाहा व्हायरल व्हिडीओ