‘मोदींच्या राज्यात…’; मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील कारवाईवर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर काल ईडीने कारवाई केली आहे. ईडीने पुष्पक बुलियनमधील पुष्पक ग्रुप कंपनीची 6.45 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मोदी हे कधीच सूडाचं राजकारण करत नाहीत. त्यांच्या राज्यात तरी कोणतीही सेंट्रल एजन्सी सूडाच्या भावनेने राजकारण करत नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आमच्या सर्वांविरोधात यांचे वकील मंत्र्यांसोबत बसून कसे षडयंत्र करत आहेत या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. त्या या नेत्यांनी पाहाव्यात. पण मला असं वाटतं केंद्र सरकार असेल अथवा राज्य सरकार असेल, कुणीही चुकीची कारवाई करू नये. कारवाई योग्यच झाली पाहिजे. पुन्हा एकदा विश्वासाने सांगतो, मोदींच्या राज्यात चुकीची कारवाई होऊच शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान,निलांबरी प्रकल्पातील या 11 निवासी फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे फ्लॅट्स आहेत. श्रीधर माधव पाटणकर हे या कंपनीचे मालक आहेत.

पीएमएलए कायदा 2002 अंतर्गत 6 मार्च 2017पासून पुष्पक बुलियन आणि ग्रुप कंपनीजवर मनी लॉन्ड्रिंगची केस सुरू आहे. यापूर्वीही ईडीने पुष्पक बुलिनय कंपनीतील महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबातील 21.46 कोटीची संपत्ती जप्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“होय, आम्ही गांधी-नेहरू घराण्याचे गुलाम आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहू” 

“एक पुतिन दिल्लीत बसलेत, ते रोज आमच्यावर मिसाईल सोडताहेत” 

Corona Virus | कोरोनाच्या नव्या Omicron BA-2 व्हेरिएंटचं पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध 

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा 

“सतेज पाटील हा माणसं खाणारा माणूस, विरोधकांनो सावध राहा”