“महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार”

पिंपरी | पिंपरी चिंचवड शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार आहे. त्या पुतळ्याची उंची 140 फूट एवढी असणार आहे. शहरातील सर्व तरूणांना प्रेरणा देणार शिल्प ठरणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी थडी जत्रेचं आयोजन केलं आहे. या जत्रेच उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेतले तरी तरुणांमध्ये एक वेगळी उर्जा येते. या शिल्पाच्या उद्‌घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही यावे अशी आमची अपेक्षा असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात जोपर्यंत महिला सक्षम होणार नाहीत, तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशाकडे आपण जर पाहिले तर त्या देशाने केव्हाच प्रगती साधली आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अभिमानास्पद…. जगप्रसिद्ध ‘आयबीएम’च्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी अरविंद कृष्णा!

-उद्धवसाहेब, भाजपने सुरू केलेल्या योजना बंद करू नका; रावसाहेब दानवेंचं सरकारला आवाहन

-सुपर ओव्हरमध्ये मी बँटींग करायला जाणार नव्हतो पण….. ; विराट कोहलीने सांगितला किस्सा