“देवेंद्रजी उघडा डोळे बघा नीट, मुख्यमंत्री तुम्ही नाही तर…”

मुंबई | राज्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध मुद्द्यांवरून चांगलाच वाद पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या आपल्या कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी संबोधित करत आहेत. महाविकास आघाडीच्या विरोधात ठामपणे काम करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

राज्याचे मुंख्यमंत्री आणि कधीकाळीचे फडणवीस यांचे राजकीय सहकारी उद्धव ठाकरे हे सध्या आजारी असल्यानं उपचार घेत आहेत. परिणामी राज्यात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीला आज संबोधित केलं आहे. आपल्या भाषणादरम्यान फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

फडणवीस यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. परिणामी या दोन्ही नेत्यांमधील वाद वाढण्याची चिन्ह आहेत.

फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस माननीय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण ते आतापण स्वतःला मुख्यमंत्री मानत आहेत, अशी टीका मलिक यांनी केली आहे.

देवेंद्रजी, उघडा डोळे बघा नीट, स्वप्नं बघायचं बंद करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आहेत तुम्ही नाही, अशी खुमासदार टीका मलिक यांनी केली आहे. परिणामी मलिक यांच्या या टीकेची सध्या जोरदार चर्चा आहे.

एसटी कर्मचारी संपावरून फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. राज्यात चालू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजप उगाच हवा देत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा या अगोदरही आपल्या वक्तव्यावरून ट्रोल होण्याची वेळ आली आहे. आताही फडणवीस यांना मीच मुख्यमंत्री या त्यांच्या वक्तव्यावरून जबरदस्त ट्रोल करण्यात येतं.

दरम्यान, 2019 विधानसभेच्या प्रचारादरम्यान फडणवीस यांनी दिलेली मी पुन्हा येणार ही घोषणा चांगलीच गाजली होती. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच आहे, असं मला आताही वाटत असल्याचं फडणवीस काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

 ‘कपडे काढले तरी निर्लज्जांवर परिणाम होत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

“…म्हणजे पुर्ण बारामती चुकली का?; भाजपचा असला म्हणून काय झालं”

भाजप की काॅंग्रेस! कोल्हापूरच्या आखाड्यात कोणाचा पैलवान जिंकणार?

 “गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणणं म्हणजे हा गेंड्याचाच अपमान”

“उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”