“माझा राजा उपाशी असताना मी घरात कसा बसू? छत्रपतींचा मावळा म्हणून…”

मुंबई | खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या काही मागण्यासाठी आझाद मैदानात आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. राज्यातील अनेक भागातून या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविण्यात येतोय.

आरक्षण नसल्यामुळे समाजाचे होणारे शैक्षणिक, सामाजिक व नोकऱ्यांमधील नुकसान या अन्यायाची झळ कमी व्हावी, यासाठी संभाजीराजे यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

संभाजीराजेंच्या या आंदोलनात आता अनेक नेत्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी पाठिंबा दिल्याचं पहायला मिळतंय. अशातच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आज आंदोलन स्थळी पोहोचले.

माझा राजा उपाशी असताना घरात कसा बसू? छत्रपतींच्या वंशजांचं कुटुंब उपाशी आहे हा काळा दिवस असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

राजर्षी शाहू महाराज ज्यांनी आरक्षण संकल्पना जगाला सांगितली त्यांचे वंशज आज उपोषणाला बसले आहेत, असंही माने म्हणाले. मी संभाजीराजेंचा हा संघर्ष जवळून पाहिलाय, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

मी सांगू इच्छितो की, मी इथे खासदार म्हणून नाही तर छत्रपतींचा मावळा म्हणून आलोय, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. शौर्याची परंपरा देशाला घालून देणारे घराणे आहे. आपल्या आशीर्वादनं मी खासदार झालो, असंही माने यावेळी म्हटलेत.

दरम्यान, राजेंचा एक मावळा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत गाऱ्हाणं घेऊन जाईन, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –  

“नवाब मलिक जेलमध्ये आहेत, मग अजित पवार बाहेर कसे?”

“ठाकरे सरकारने मराठा बांधवांच्या संयमाचा अंत पाहू नये”

मोठी बातमी! युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींना फोन, म्हणाले…

‘थोडं थांबा, साहेब रशियाला दम देत्यात…’; निळू फुलेंचा तो काॅमेडी व्हिडीओ तुफान व्हायरल!

रशिया आक्रमक! राजधानी कीवमधील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल