राष्ट्रवादीला खिंडार; हे माजी खासदार मोदींच्या उपस्थितीमध्ये करणार भाजपत प्रवेश??

कोल्हापूर |  कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक पवारांना रामराम करून पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मोदी 31 ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

धनंजय महाडिक हे अगोदर शिवसेनेत होते, मग त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून कोल्हापूरचे ते खासदार झाले. मात्र यंदा त्यांचा पराभव झाला आणि आता ते भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केला तर तो त्यांचा तिसरा पक्ष असणार आहे.

संसदरत्न पुरस्कार मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला. शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी महाडिकांचा तब्बल 2 लाख मतांनी पराभव केला.

दरम्यान, धनंजय महाडिक यांचा भाजपप्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-