“आप्पा… तुम्ही अंगीकारलेला लोकसेवेचा वसा मी पुढे सुरू ठेवणार हा माझा शब्द”

बीड | भाजपचे ज्येष्ठ दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त निमित्त त्यांचे पुतणे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एक भावूक ट्विट केलं आहे.

आप्पा, तुम्ही अंगीकारलेला लोकसेवेचा वसा मी अविरत पुढे सुरू ठेवणार हा माझा शब्द आहे. सदैव तुमच्या आठवणीत, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजुर, कष्टकरी, वंचित-उपेक्षित, दीन दुबळ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचा विकास साधण्यासाठी मला बळ द्या, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

गोरगरीब, कष्टकरी, वंचित, उपेक्षित वर्गाच्या आयुष्यात थोडेफार जरी सकारात्मक बदल घडवणारं काम करता आलं तर तीच माझी तुमच्यासाठी खरी श्रद्धांजली नव्हे तर गुरुदक्षिणा ठरेल, असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीदिनी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. आप्पा, तुम्ही अंगीकारलेला लोकसेवेचा वसा मी अविरत पुढे सुरू ठेवणार हा माझा शब्द आहे. सदैव तुमच्या आठवणीत pic.twitter.com/Iv6rC2RvmC

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 3, 2020

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ दोन माजी आमदारांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

-संकटाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज; 40,000 नागरिकांना हलवलं

-पुढील सहा तासांत चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार- हवामान विभाग

-सरकारच्या सूचनांचं पालन करा, बाहेर पडू नका; सुप्रिया सुळेंचं जनतेला आवाहन

-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्रीवादळात प्रशासनासोबत मदतीला उभं रहावं- शरद पवार