जनतेसाठी झटणार, उतणार नाही मातणार नाही; धनंजय मुंडेंचं भावूक ट्विट

बीड | मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळीत आले होते. यावेळी परळीकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावर मुंडे यांनी ट्विट करत जनतेचे आभार मानले आहेत. विरोधी पक्षनेता होतो तेव्हा लोकांचे प्रश्न सभागृहात, सभागृहाबाहेर मांडले हा माझा वारसा आहे. हा वारसा मी कायम जपणार. जनतेसाठी झटणार. उतणार नाही मातणार नाही, जनसेवेचा वारसा सोडणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

माझी नाळ ही परळीच्या मातीशी जुळलेली आहे आणि माझा जीव या मातीतल्या माणसात आहे. म्हणूनच मी या मातीतल्या माणसाला मोठे करण्याचे स्वप्न पाहिले आहे आणि ते मी पूर्ण करणारच. सामाजिक न्याय मंत्री म्हणून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करणारच, असंही ते म्हणाले आहेत.

परळीकर जनतेने इतके अलोट प्रेम केले आहे की नुसते आभार मानून त्यांचे ऋण कधीच फिटणार नाहीत. त्यांच्या कायम ऋणात राहता यावे आणि आयुष्यभर त्यांची सेवा करता यावी हेच खरे आभार मानणे ठरणार आहे, असं ते म्हणाले.

राज्याच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर काल परळीत अभूतपूर्व सत्कार झाला. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला कार्यक्रम रात्री एक वाजता संपला. ध्वनिक्षेपकाच्या वेळेचे बंधन पाळत भाषण करणे टाळले आणि व्यासपीठावर नतमस्तक झालो, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

जनतेसाठी झटणार, उतणार नाही मातणार नाही; धनंजय मुंडेंचं भावूक ट्विट