‘सस्ती चीज’ म्हणत दिग्दर्शकाची स्वरा भास्करवर बोचरी टीका!

मुंबई | ड्रीम गर्ल चित्रपटाचा दिग्दर्शक राज शांडिल्यने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री स्वरा भास्करची खिल्ली उडवली आहे. त्यांनी स्वरा भास्कर पेक्षा जास्त तर दैनिक भास्कर महागडा आहे असं म्हटलं आहे. त्या ट्विटला रिट्विट करत स्वराने त्यांना चांगलंच सुनावलं आहे.

पुढच्या वेळी एकाद्या भूमिकेची ऑफर देताना किंवा तुमच्या आगामी चित्रपटाचे ट्रेलर शेअर करायला सांगण्याची विनंती करण्यापूर्वी तुम्ही देखील एकदा विचार करा, असं म्हणत स्वराने दिग्दर्शक राज शांडिल्य यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

राज शांडिल्यने सोशल मीडियावर ‘स्वस्त वस्तूंवर लक्ष देऊ नका, स्वरा भास्कर पेक्षा तर दैनिक भास्कर जास्त किंमतीत विकला जातो’ असे लिहित ट्विट केले होते. या ट्विटवर स्वराने रिट्विट करत राजला चांगलेच सुनावलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्कर सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर तिची मतं मांडताना दिसते.

 

महत्वाच्या बातम्या-