तुम्हाला एकच मुलगी का?; शरद पवारांनी दिलं जबरदस्त उत्तर

मुंबई | महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांचा आज 80वा वाढदिवस आहे. पवार साहेब यांच्या वाढदिवसानिम्मित आज जगभरातील लोक त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत आणि त्यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करत आहेत.

शरद पवार हे केवळ देशाच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या राजकारणात गाजलेलं अतिशय उच्च नाव आहे. आज शरद पवारांची मुलगी आणि राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. सुप्रिया सुळे अगदी शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालत आहेत. त्या शरद पवार यांच्या एकुलती एक कन्या आहेत.

शरद पवारांना एकुलती एकंच मुलगी असण्यासंबंधित दूरदर्शनच्या एका मुखातीत पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पवारांनी अगदी अभिमान वाटावा, असं उत्तर दिलं होतं. मुलगा हवाच असा हट्ट असताना देखील तुम्हाला एकंच मुलगी कशी काय? असा प्रश्न अनेकवेळा लोक तुम्हाला करत असतील त्या लोकांचं तुम्ही समाधान कसं करता, असा प्रश्न पवार साहेबांना मुलखती दरम्यान विचारण्यात आला होता.

या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, या प्रश्नाला मला अनेकदा उत्तर द्यावं लागतं. खेड्यापाड्यात गेल्यावर लोक मुलगा असता तर बरं झालं असतं, असं म्हणतात. शेवटी नाव चालवायला घरात कोणीतरी पाहिजे किंवा बरं वाईट झालं तर अग्नी देण्यासाठी पाहिजे.

मात्र, हा प्रत्येकाचा पहायचा दृष्टीकोन आहे. मला असं वाटतं की अग्नी देण्यासाठी कोण असणार याची चिंता करायची की जिवंत असताना नीट नेटकं वागणाऱ्याची चिंता करायची, असं उत्तर पवारांनी यावेळी दिलं होतं.

तसेच शरद पवार पुढे म्हणाले होते की, आम्ही सतत सगळ्या देशाला, महाराष्ट्राला कुटुंब नियोजन करा म्हणून मार्गदर्शन करत राहणार आणि आपल्या घऱात भरपूर गर्दी करणार, हे काय योग्य दिसणार नाही. कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आपण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत इतर जणही थांबण्याचा विचार करत नाहीत.

त्याचदृष्टीने मुलीवरच समाधान मानण्याची भूमिका मी आणि पत्नीने घेतली. आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला होता. एकच मुलगी आहे म्हणून मला कधीच दुख: झालं नाही. मुलगा नाही अशी शंकाही कधी माझ्या मनात आली नाही.

मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून, समान वागणूक देऊन, तिचा आत्मविश्वास वाढवून, तिच्याकडून उत्तम प्रकारचं काम करुन घेऊ शकतो, असं जबरदस्त उत्तर शरद पवार यांनी यावेळी दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

“मी शपथ घेवून सांगतो हा माझा मुलगा नाही” – इमरान हाश्मी

पंकजा मुंडेंनी कसं घटवलं 14 किलो वजन?; सांगितल्या खास टिप्स (maharashtrakesari.in)

धक्कादायक! कोरोनाची लस घेतली अन् HIV इन्फेक्शन झालं? (maharashtrakesari.in)

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर आता कृषी मंत्र्यांचं कृषी विधेयकावर मोठं वक्तव्य, म्हणाले…

“राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र; शरद पवारांचं नाव त्याच कटाचा भाग”