हा अपघाताने पसरलेला विषाणू नाही तर हा अमेरिकेवर हल्ला; ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा टीकेचा बाण

वॉशिंग्टन |  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर टीकेचा बाण सोडला आहे. हा अपघाताने पसलेला विषाणू नाहीये तर हा अमेरिकेवर हल्ला केलेला आहे, असं म्हणत त्यांनी चीनचं नाव न घेता चीनवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

आमच्यावर हल्लाच केला गेला आहे. घडत असलेली घटना ही अपघात नाहीये. 1917 नंतर कुणीही असं काही पाहिलेलं नाहीये, असं ते म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. लाखो लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 50 हजारांहून अधिक जणांचे कोरोनाने प्राण घेतले आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 3 हजार लोकांना जीवनाला मुकावं लागलं आहे. अमेरिकेने कोरोनाशी दोन हात करण्याकरिता मोठं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे.

आपण जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होतो. परंतू त्यांनी (चीनचा उल्लेख करण्याचं त्यांनी टाळलं) आपल्याला सगळं बंद करण्यास भाग पाडलं आहे. परंतू काही दिवसांमध्ये आपण पुन्हा सगळं सुरळित करू आणि पुन्हा एकदा गगनभरारी घेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुस्तकं दुकाने, पंख्यांची दुकाने सुरू होणार तसंच मोबाईल रिचार्ज करता येणार

-या परिस्थितीत परराज्यात अडकलेल्या लोकांना परत आणणं मुश्किल- बिहार सरकार

-बीड जिल्हा कोरोनामुक्त; धनंजय मुंडेंकडून जिल्हावासियांचं कौतुक

-आरोग्य विभागात अत्यावश्यक पदे भरणार, आरोग्यमंत्र्यांची माहीती

-1200 तबलिगी अजूनही गायब; तपासासाठी पोलिस जंग जंग पछाडतायेत