नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणतात…

दिल्ली| अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “सीएए हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाहीत”, असं स्पष्टीकरण डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे. ट्रम्प मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झालेली नाही”, असं देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना सीएएवरुन दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराबाबत विचारले असता, “मी याबाबत ऐकलं आहे. मात्र, या विषयावर आम्ही चर्चा केलेली नाही”, असं ट्रम्प यांनी उत्तर दिलं.

“आम्ही धार्मिक स्वातंत्र्याबाबत चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी धार्मिक स्वातंत्र्यावर विश्वास करतात”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आणि समर्थनार्थ सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसाचाराचं वेगळं वळण लागलं आहे. सीएएचे समर्थक आणि विरोधक यांच्यात समोरासमोर दगडफेक होत आहेत. या हिंसाचारामुळे दिल्ली धुमसत आहे. यात काही जणांना बळीदेखील गेल्याची माहिती मिळत आहे. या दंगलीत एका पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मराठा आंदोलकांना न्याय मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आक्रमक

-हे तीन पक्षाचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालण्याच्या नादातच पडेल- रावसाहेब दानवे

-दंगलखोरांना दिसताच क्षणी गोळ्या घाला; गृहमंत्रालयाने दिले आदेश

-हे सरकार महाविकास आघाडी नव्हे तर स्थगिती सरकार आहे; रावसाहेब दानवेँची टोलेबाजी

-“राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था राखायला मोदी सरकार अपयशी ठरलं”