…तोपर्यंत रेल्वे स्थानकावर गर्दी करु नका; रेल्वे प्रशासनाचं आवाहन

मुंबई |  रेल्वेने बाहेरगावी जायची ज्यांची व्यवस्था करण्यात येईल त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत आणण्याची सोय राज्य शासन करणार आहे. त्यामुळे जोपर्यंत संबंधितांकडून कळविले जाणार नाही, तोपर्यंत कोणीही विनाकारण रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांसाठी तसंच परप्रांतीय मजुरांसाठी आता विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था काही अटी आणि शर्थींसह सुरू केली आहे. मात्र यामुळे रेल्वे स्टेशनवरील गर्दी वाढण्यास सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने हे आवाहन केलं आहे.

महाराष्ट्रातून परराज्यात रेल्वेने जाणाऱ्या नागरिकांसाठी स्थानिक नोडल अधिकाऱ्यांमार्फत नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे जोपर्यंत आपली नोंदणी होत नाही आणि प्रशासन सूचना देत नाही तोपर्यंत रेल्वे स्थानकावर गर्दी करू नये, असं आवाहन रेल्वेने केलं आहे.

दरम्यान, शुक्रवारी लॉकडाऊनच्या काळात कामगारांना आपल्या घरी जाम्याकरिता पहिली ट्रेन धावली. तेलंगणाहून झारखंडला ही पहिली विशेष रेल्वे सोडण्यात आली. तर आज नाशिकहून लखनौच्या दिशेने देखील ट्रेन सोडण्यात आली. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ट्रेनला हिरवा कंदील दर्शवला.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रातील 104 वर्षे जुन्या सहकारी बँकेचा परवाना रद्द; लॉकडाऊनमध्ये खातेधारकांची आर्थिक कोंडी

-“कोरोनावर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर औषध भारताने मिळवलं पाहिजे”

-“मराठी माणूस ही घटना, त्यामागची माणसं आणि त्यामुळे भळभळलेली जखम कधीही विसरणार नाही..”

-‘मातोश्री’ प्रवेशद्वारावरच्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण

-‘फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांना आवरा’; भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी