जनता कर्फ्यूवेळी केलेली ‘ती’ चूक 5 एप्रिलला करू नका- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | जनता कर्फ्यूतून भारतीयांनी जगासमोर आर्दश ठेवला आहे. कुणीही एकटं समजू नये 130 कोटी जनतेची ताकद प्रत्येक भारतीयासोबत असल्याचं सांगतानाच मोदी यांनी 5 एप्रिलला नऊ मिनिटं मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅश लावण्याचं आवाहन केलं. मात्र हे करत असताना जनता कर्फ्यूला केलेली चूक करू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे केलेल्या लॉकडाउनचा आज 9 वा दिवस असून पंतप्रधान मोदींनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला आणि पुन्हा एक नवीन उपक्रम राबवला आहे.

जनता कर्फ्यूवेळी लोकांनी एकत्र येत. रस्त्यावर मिरवणूक काढत टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे मोदींनी येत्या 5 एप्रिलला कोणाही जनता कर्फ्यूवेळी केलेली चूक करू नका, असं मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, तुम्हाला सोशल डिस्टन्सिग पाळायचं आहे. कुणीही एकत्र यायचं नाही. कुठेही गर्दी करायची नाही. एकटं राहायचं आहे. एकटं राहुनच हे करायचं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हाच रामबाण उपाय असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-“प्रसिद्धी स्टंट बंद करून कोरोणा विरोधात काहीतरी ठोस पावलं उचला”

-“भारतीयांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे, ते नक्कीच कोरोनाला हरवतील”

-“नका सतत दोष काढू! फक्त 9 मिनिटं पणती, दिवा लावायचा आहे”

-“तबलिगी जमातीच्या सदस्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवू नये.. ही सरकारची जबाबदारी”

-महाराष्ट्रातील 1400 जणांची निजामुद्दीनला हजेरी; आरोग्यमंत्र्यांची खळबळजनक माहिती