“सध्या जगभरात, देशात कोरोना विषाणूचं संकट उभं असताना गुढीपाडव्याची खरेदी करायला घराबाहेर पडू नका”

मुंबई | सध्या जगभरात, देशात कोरोना विषाणूचं संकट उभं असताना गुढीपाडव्याची खरेदी करायला घराबाहेर पडू नका, असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलंय.

देशभरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना सर्वांनी गंभीरता लक्षात घ्या असंही त्यांनी म्हटलंय. फेसबुकवर पोस्ट लिहित शरद पोंक्षे यांनी हे आवाहन केलंय.

कोरोना संकट टळलं की मग एक दिवस गुढीपाडवा साजरा करू. पण आता घरातल्या घरातच जे साहित्य उपलब्ध आहे त्यात करूया. ही कळकळीची विनंती आहे. हे सर्वांपर्यंत पोचवा, असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे.

जे साहित्य उपलब्ध आहे त्यात गुढी उभी करा.त्याची खरेदी करायला बाहेर पडायची गरज नाही. देव रागवत नाही की चिडत नाही. धर्मही भ्रष्ट होत नाही. संकट दाराशी उभं आहे. कधीही घरात प्रवेश करू शकतं, असं शरद पोंक्षे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या – 

-‘गो करोनिया गो’…. पाहा विनोदवीर कुशल बद्रिकेचं भन्नाट गाणं

-कोरोनानंतर चीनमध्ये आला हंता विषाणू; एकाचा मृत्यू, 32 जणांची चाचणी

-“मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार कराल तर जेलमध्ये टाकायलासुद्धा शासन मागेपुढे पाहणार नाही”

-‘मी समाजाचा शत्रू आहे’, बाहेर फिरणारांच्या हातात पोलिसांनी दिले बोर्ड!

-शेतकऱ्यांच्या मदतीला शरद पवार धावले; केंद्रीय मंत्र्यांकडे केली विनंती