“मुस्लिम आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली लाचारी दाखवून दिली”

मुंबई | महाविकास आघाडीनं मुस्लिमांना शैक्षणिक संस्थामध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचा कायदा आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या मुस्लीम आरक्षण हा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त प्रांतमंत्री डॉ. जैन यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केवळ सत्तेपोटी ही लाचारी पत्करली आहे. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह संपूर्ण जनतेच्या विश्वासाला तडा दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडून अशी अपेक्षा नव्हती, असं म्हणत जैन यांनी टीका केली आहे.

धर्माच्या आधारावर कोणालाही आरक्षण मिळू देणार नाही. त्यासाठी न्यायपालिकेपासून रस्त्यापर्यंतची लढाई लढण्यात येईल, असा इशाराही जैन यांनी दिला आहे. त्यामुळे आरक्षणच्या मुद्द्यावरुन विश्व हिंदू परिषद आक्रमक झाल्याचं दिसतंय.

दरम्यान, हिंमत असेल तर त्यांनी राज्यातील घुसखोर बांगलादेशींना बाहेर काढून दाखवावे. या कार्यात त्यांना बजरंग दल साथ देईल, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पंकजांच्या पराभवाचा फेटा खासदार कोल्हेंनी परळीत जावून बांधला

-अजून किती दिवस इंदोरीकरांच्या वक्तव्याचं भांडवल करणार आहात- सिंधुताई सपकाळ

-“मुस्लिमांची दाढी कुरवाळणारी शिवसेना औरंगाबादचं संरक्षण करेल काय?”

-मित्र असावा तर तो अमोल कोल्हेंसारखा- धनंजय मुंडे

-“फक्त आणि फक्त पत्नीमुळं देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढत आहेत”